ऑनलाईन डोनेशन गेटवेचे अनावरण

शाळेच्या ऑनलाईन डोनेशन गेटवेचे अनावरण - जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वतः देणगी देऊन केले उदघाट्न

कोल्हापूर: येथील स्वयम विशेष मुलांच्या शाळेच्या ऑनलाईन डोनेशन गेटवेचे अनावरण जिल्हाधिकारी व इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे चेअरमन श्री दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. देसाई यांनी स्वतः दहा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन या डोनेशन गेटवेचे अनोख्या पद्धतीने उदघाट्न केले.

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे व्हाईस चेअरमन अमरदीप पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना देसाई म्हणाले ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरु झाल्याने कोल्हापूरच न्हवे तर संपूर्ण देशात कुठूनही एका क्लिकवर स्वयम शाळेला देणगी देणे आता शक्य होणार असून या विशेष मुलांना स्वयंनिर्भर होण्यासाठी सर्वांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. या विशेष मुलांना जगण्यासाठी प्रेरणा मिळावी तसेच त्यांनाही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघता यावे यासाठी समाजातील सहृदय नागरिकांनी देणगीरुपी मदत करावी असे आवाहन देसाई यांनी केले. ही सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या अग्नीस डेव्हलपर्सच्या गिरीश बारस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे व्हाईस चेअरमन अमरदीप पाटील, सचिव सतीशराज जगदाळे, खजानीस महेंद्र परमार, स्वयम स्कुल कमिटीच्या सौ. शोभा तावडे, शशिकांत फडतरे, मनीष देशपांडे, मुख्याध्यापक प्रमोद भिसे उपस्थित होते. सचिव सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.

स्वयम शाळेला देणगी देण्यासाठी या लिंकला भेट द्यावी असे आवाहन स्वयम शाळेतर्फे करण्यात आले आहे.

DONATION

We are seeking funds to fulfill the needs of SWAYAM School for Special Children

Help Us By Paying Entire Education Expence Purchasing our Products Paying School Fees Educational Material Workshop Apparatus Yearly Expenses Donation in Cash

© 2020 All Rights Reserved. Swayam School for Special Children

Web Design by Agnis Designers, Kolhapur